Sun. Sep 19th, 2021

मुंबई महापालिकेच्या निविदेला चार कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई: सव्वा कोटी मुंबईकरांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या एक कोटी लशींच्या जागतिक निविदेला सोमवारपर्यंत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या चारही कंपन्या रशियाच्या असून त्या ‘स्पुटनिक’ लशींचा पुरवठा करणार आहेत. लसीकरणासाठी मुंबई महापालिका तब्बल ७५० ते ८०० कोटी रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, निविदा भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

निविदेला मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ मे रोजी रशियाच्या ‘आरडीआयएफ’कडून स्पुटनिक लस पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यापाठोपाठ २१ मे रोजी आणखी एका कंपनीने स्पुटनिकसाठी आपला प्रस्ताव दिला आहे.

पालिकेला लसीकरणासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज असून पुढील दोन महिन्यांत या कंपन्यांनी लस पुरवठा करण्याची हमी दिली आहे. तर पालिकेने एक महिन्यात पुरवठा करण्याचा आग्रह धरला असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *