Wed. Dec 1st, 2021

तब्बल 16 तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

शनिवारी चिपळूण मधील परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग गेले 16 तास ठप्प होता. मोठा डोंगर इथे महामार्गवर कोसळल्याने दोन्ही बाजुची वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. 

शनिवारी चिपळूण मधील परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग गेले 16 तास ठप्प होता. मोठा डोंगर इथे महामार्गवर कोसळल्याने दोन्ही बाजुची वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.  तब्बल 14 ते 16 तासांनी घाटामधील वाहतूक सुरु करण्यात प्रशासनाला यश आलं होतं. रात्री देखील मलबा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

चिपळूण मधील परशुराम घाटात दरड कोसळल्याने शनिवारी मुंबई- गोवा महामार्ग बंद करण्यात आला होता.

घाट कड़ा म्हणजेच मोठा डोंगर परशुराम घाटात कोसळला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद होती.

या ठिकाणी दोन्ही बाजुची वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध नाही.

यामुळे गेले 16 तास सर्व प्रकारची वाहने अड़कुन पडल्याने वाहन चालकांना समस्येला सामोर जावं लागलं होतं.

हा मलबा काढण्याचं काम रात्रभर युद्ध पातळीवर सुरु होतं. प्रशासनाला तब्बल 14 ते 16 तासांनी मलबा काढण्यात यश आलं आहे.

अजूनही असुरक्षित असणारा डोंगर केव्हाही कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे.4 तासात महामार्ग मोकळा करू हा प्रशासनाचा दावा फेल ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *