Thu. Jun 17th, 2021

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, खासदार संभाजीराजेंची मागणी

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. याबाबतचे दोन पानी लेखी निवेदन लिहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

संभाजीराजे यांनी एक ट्विट करत ही मागणी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दोन पानी लेखी निवेदन ट्विट केलं आहे.

काय म्हणाले संभाजी राजे ?

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, ही महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहास प्रेमींच्या मनातली ही मागणी आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला.कोकणच्या या सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *