पुणे बलात्कार प्रकरणी फाशी देण्यास विलंब झाल्याने दोषींची शिक्षा रद्द
पुण्यात 1 नोव्हेंबर 2007 रोजी बीपीओ कर्मचारी महिलेवर कारचालकाने बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पुण्यात 1 नोव्हेंबर 2007 रोजी बीपीओ कर्मचारी महिलेवर कारचालकाने बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. फाशीच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याने ही शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
1 नोव्हेंबर 2007 रोजी ही महिला नाइट ड्युटी संपवून कंपनीच्या वाहनातून घरी येत होती. कारचालक पुरुषोत्तम बोराटे व त्याचा साथीदार प्रदीप कोकाटे यांनी या महिलेवर बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर या दोघांनी ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली तसेच ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रुप केला. हे सगळं एका निर्जन स्थळी घेवून जावून हा प्रकार केला.
या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने मार्च -2012 रोजी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही हीच शिक्षा दिली होती. याप्रकरणी दया याचिका देखील राज्यपाल व राष्ट्रपतींनी फेटाळली होती.
यावर्षी 10 एप्रिल रोजी वॉरंट काढून 24 जून ही फाशीची तारीख ठरवण्यात आली होती. परंतु या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली होती. यामुळे आरोपींनी फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी आरोपींनी केली होती.
याप्रकरणी न्यायालयानं दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून तिचे जन्मठेपेत रूपांतर केले आहे. या दोघांना आता 35 वर्षांची जन्मठेप झाली आहे.
#PuneBpoGangrapeCase #MumbaiHighCourt #Death #Rapists