मुंबई उच्च न्यायालयाकडून ऍड. सदावर्तेंना दिलासा

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल झालेल्या गुन्हाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
ऍड. गुणरत्न सदावर्तेंना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटी शर्तींसह सदावर्तेंचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मराठा सामाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते. तसेच सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्जदेखील केला होता. मात्र, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थरकडे रवाना झाला. दरम्यान, सदावर्तेंना याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. तर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदावर्तेंना मिळालेल्या अटकपूर्व जामिनाच्या अटी-शर्ती
आक्षेपार्ह वर्तन आणि वक्तव्य करू नये.
पोलिसांच्या तपासात सहकार्य करणे.
शहर सोडताना पोलिसांना कळवणे.