Fri. Jun 21st, 2019

तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर 22 फेब्रुवारीला सुनवाणी

0Shares
काही दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संश्यावरून डॉ. तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने तेलतुंबडे यांच्यावरील अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. डॉ आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनीसाठी मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर आता 22 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे ुपोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक केली तर 1 लाख रुपयांचा जातमुचलका आणि त्याहून अधिक रकमेच्या हमीवर त्यांची सुटका करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले आहे. तसेच डॉ आनंद तेलतुंबडे यांनी पुणे पोलिसांसमोर 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर रहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: