’14 वर्षांची पत्नी आणि 52 वर्षाचा पती’, कोर्ट म्हणत…

14 वर्षांच्या पत्नी आणि 52 वर्षाचा पती हे ऐकायला थोडसं वेगळ वाटतं. पण चक्क मुंबई उच्च न्यायालयाने या जोडीला मान्यता दिली आहे. भारतात बालविवाहाला बंदी असताना देखील अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. हे या प्रकारामुळे समोर आले आहे. मुंबईमध्ये एका 56 वर्षाच्या वकिलाने 14 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं होतं. हे लग्न 2014 मध्ये झालं होतं. यामुळे या वकिलावर पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु १७ सप्टेंबर २०१८ रोजी ही मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर हे लग्न कोर्टाने मान्य केलं आहे.
म्हणून कोर्टाकडून हे लग्न केलं मान्य?
मुंबईमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीचे 52 वर्षीय वकिलाशी झालेले लग्न मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे.
हे लग्न 2014 मध्ये झाले होतं परंतु आता मुलीचे वय 18 आणि तिच्या पतीचे वय 56 वर्ष आहे.
यामुळे या वकिलावर पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
ही मुलगी 18 वर्षाची झाल्यावर वकीलाने कोर्टात याचिका दाखल केली होती.
मुलगी आता विवाहित असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. समाजात तिला आता इतर कोणी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही.
तिच्या सुरक्षित भवितव्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत कोर्टाने मांडले आहे.
मुलगीने पतीसोबतचं राहणार असं समत्तीपत्र लिहून दिल्यावर कोर्टाने या लग्नास मान्यता दिली आहे.