Tue. Sep 28th, 2021

शांतीपूर्ण आंदोलनांचे धडे तरुणाईकडून घ्या, न्यायालयाकडून कौतुक

JNU हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईला गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India protest) येथे विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने केलेल्या आंदोलनाचं हायकोर्टाने कौतुक केलं आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करत आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वावढवायची हे इतरांनी सध्याच्या तरुणाईकडून शिकायला हवं, असं कोर्टाने (Bombay High court) म्हटलं आहे.

‘शिवाजी पार्क (Shivaji Park) खेळाचं मैदान आहे की मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं’ याबाबत ‘वी-कॉम ट्रस्ट’ने केलेल्या जनहित याचिकेवरील (PIL) सुनावणीदरम्यान तरुणांच्या आंदोलनाचा विषय निघाला.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने तरुणांच्या आदोलनांचं कौतुक केलं.

लोक आता रस्त्यावर उतरून शांतीमय मार्गाने निषेध (JNU row) करू लागले आहेत.

अशा आंदोलनाद्वारे आपल्या आवाजाची ताकद आणखी वाढवत आहेत.

यामध्ये सध्याची तरुणाई आघाडीवर असून शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन कसं करावं याचा वस्तूपाठच त्यांनी आपल्या आंदोलनातून दिला आहे.

या आंदोलनातून लोकांनी शिकायला हवं, असंही कोर्टाने म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *