Sun. Oct 17th, 2021

हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आला निनावी फोन, १४ वर्षीय मुलाने केला धमकीचा फोन

मुंबईसाठी शनिवारचा दिवस हा अनेक अडचणींचा होता. आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समन्समुळे खळबळ झाली होती. त्यानंतर भाजपने ओबीसी पदोन्नती आरक्षणावरून जोरदार आंदोलन. तेवड्यातच दुपारच्या सुमारास ताज हॉटेलवर हल्ला होणार असल्याच्या कॉलने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले . पोलिसांनी नीट चौकशी व तपासानंतर हा केवळ अफवेचा कॉल असल्याचे समोर आले. १४ वर्षाच्या मुलाने असा कॉल का केला किंवा त्याला कोणी कॉल करायला भाग पाडले का? या संबंधीचा अधिक तपास सुरु आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाला लँडलाईनवर एक फोन आला होता . या फोनवरून बोलणाऱ्याने असं सांगितलं की ताज हॉटेलच्या एका गेटमधून काही वेळातच दोन बंदूकधारी आणि मास्क घातलेले लोक घुसणार आहेत. त्यामुळे त्या गेटवरील सुरक्षा वाढवा. हा फोन आल्यानंतर ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाने थेट पोलिस कंट्रोल रूमला फोन केला आणि फोनवरून दिलेली माहिती सांगितली. पोलिसांनी त्या दृष्टीने सुरक्षा वाढवली आणि आसापासच्या परिसरात शोध घेतला .

ताज व्यवस्थापनाने जेव्हा पोलिसांना या कॉलबद्दल माहिती दिली तेव्हाच हा अफवेचा कॉल असेल असा अंदाज पोलिसांना आला होता. पण जेव्हा संपूर्ण शोध घेतला तेव्हा हा फोन साताऱ्यातील कऱ्हाड येथून १४ वर्षाच्या मुलाने केल्याचं समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *