Thu. Jun 17th, 2021

मुंबई सुरक्षित नाहीच

मुंबई: संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच कोरोना काळात मुंबईमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक भयभीत झालेले असताना मुंबईतील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. चोरी, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि महिलांवरील गुन्ह्यात मागील चार महिन्यांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे.

मुंबईत गुन्हेगारीचा आलेख हा उंचावतच आहे. तसेच महिलांवरील गुन्ह्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार मुंबईत मागील चार महिन्यांत ५० जणांची हत्या झाली असून चार महिन्यांत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे तब्बल ९०० गुन्हे मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहे. त्याचबरोबर चोरी, वाहनचोरी, जबरी आणि खुनाचे प्रयत्न या गुन्ह्यांत देखील कमालीची वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *