Sun. Jun 16th, 2019

IPL 2019 : मुंबईची बंगळुरूवर 5 गडी राखून मात

25Shares

हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जीवावर मुंबईने बंगळुरूवर 5 गडी राखत मात केली आहे.मुंबईत वानखेडे मैदानावर हा सामना झाला.बंगळुरूने मुंबईसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते.
६ चेंडू राखून मुंबईने हे आव्हान पुर्ण केले आहे

बंगळुरूचं मुंबईसमोर १७२ धावांचे आव्हान

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली एका चौकारासह 9 धावांवर झेलबाद झाला.

डावखुरा सलामीवीर पार्थिव पटेलने  20 चेंडूत 4  चौकार आणि 1  षटकार खेचत 28  धावा केल्या.

एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांनी दोघांनी तब्बल 95  रनांची पार्टनरशीप केली.

मोईन अली माघारी गेला. अलीने35 चेंडूत 50  धावा केल्या.

डीव्हिलियर्स 51  चेंडूत 75 धावांची झंझावाती खेळी करत धावचीत झाला.

बंगळुरूने  मुंबईसमोर 172  धावांचे आव्हान ठेवले.

 

मुंबईकडून 172 धावांचे 6 चेंडू राखून पूर्ण

कर्णधार रोहित शर्माने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरूने  मुंबईसमोर  १७२ धावांचे आव्हान ठेवले होते.

रोहित शर्मा 2  चौकार आणि 2 षटकार लगावत 28  धावा  करुन बाद झाला.

डी कॉक ने 5 चौकार आणि 2 षटकार खेचत 40  धावा केल्या.

ईशान किशन 3  षटकारांसह 9  चेंडूत 21 धावा करत बाज झाला.

सूर्यकुमार यादव फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 23  चेंडूत 29 धावा केल्या.

कृणाल पांड्यादेखील 11  धावांवर बाद झाला  आणि  हार्दिक पांड्याने 16  चेंडूत नाबाद 37  धावा केल्या.

25Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *