Mon. Dec 6th, 2021

मुंबई इंडियन्सकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

यंदाच्या गुढीपाडव्याला सुद्धा कोरोनाचा कहर हा वाढतच आहे. तरीसुद्धा सडलीकडे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. क्रिकेटचा महोत्सव असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघानेही चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अर्जुन तेंडुलकर, रोहित शर्मा, आदित्य तरे, धवल कुलकर्णी यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खाननेही सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून व्हिडिओ शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आयपीएलमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे या सामन्यात जिंकून मुंबईचा संघ विजयी गुढी उभारणार का हे पाहणे, रंजक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *