Mon. May 17th, 2021

IPL 2019 : मुंबईने रोखली चेन्नईची विजयाची मालिका

आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध चेन्नई असा खेळला जाणारा हा पहिला सामना होता.यामध्ये मुंबईने चेन्नईवर 37 धावांनी मात केली आहे.मुंबईने चेन्नईसमोर 171 धावांचे आव्हान ठेवले होते परंतु, चेन्नई 20 षटकांत फक्त 133 धावांपर्यंत पोहचू शकला.मुंबईत वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला.या सामन्यानंतर पहिले तिन्ही सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाची मालिका मुंबई इंडियन्सने रोखली.

मुंबईचे चेन्नईसमोर 170 धावा

सामन्याचा नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम क्षेत्ररणाचा निर्णय घेतला.

मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी-कॉकने  7 चेंडूत 4 धावा केल्या.

रोहित शर्मा 13 धावांवर बाद झाला तर  युवराज सिंहही लवकरच बाद झाला.

सुर्यकुमार जाधव आणि कृणाल पांड्या यांनी संघाचा डाव सावरला.

सुर्यकुमारने यावेळी  त्याने ४३ चेंडूत ५९ धावा तर कृणालने ३२ चेंडूत ४२ धावा केल्या.

कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली भागीदारी निभावली

42 धावा करत 20 षटकात मंबईला 170 धावांवर पोहोचवले.

चेन्नईच्या 20 षटकांत फक्त 133 धावा

चेन्नईकडून केदार जाधवने सर्वाधिक 58 धावांची खेळी साकारली.

हार्दिक पंड्याने धोनीला 12 बाद करत मुंबईला मोठं यश मिळवून दिलं.

रविंद्र जडेजा  आल्या पावलीच परत गेला तर ड्वेन ब्राव्हो  देखील 8 धावांवर गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *