Sun. Sep 19th, 2021

#IPL2019 प्लेऑफमध्ये मुंबईचा चेन्नईवर 6 गडी राखून मात

Playoffsच्या सामन्याला मंगळवारी सुरुवात झाली असून पहिला सामना मुंबई आणि चेन्नई संघामध्ये रंगला. मुंबई संघाने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 132 धावांचे आव्हान मुंबईला दिले. मुंबई संघाने हे आव्हान सहजपणे पूर्ण चेन्नईचा पराभव केला. मुंबई संघाचा सुर्यकुमार यादवने अर्धशतक करत संघाला विजय मिळवण्यास साथ दिली. चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला असून शुक्रवारी अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

मुंबईचा दणदणीत विजय –

Playoffs च्या सामन्याला सुरुवात झाली असून पहिलाच सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये रंगला.

नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

132 धावांचे आव्हान मुंबईला दिले.

हे आव्हान मुंबईने सहजपणे पूर्ण करत विजयाचा शिखर गाठला.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला.

मात्र सूर्यकुमार यादवने चांगली खेळी करत संघाला पराभवापासून बचावले आणि विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादवने नाबाद 71 धावा करत अर्धशतक पूर्ण केले.

तसेच ईशान किशनने सुद्धा 28 धावा केल्या.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *