Sat. Jul 31st, 2021

#IPL2019 मुंबईचा कोलकातावर ९ गडी राखून विजय

मुंबई आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत मुंबईला १३४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करताना मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत मुंबईला विजयी ठरवले. कोलकाताचा पराभव झाल्यामुळे हैदराबाद संघाने प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवले आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगला.

मुंबईचा दणदणीत विजय –

मुंबई आणि कोलकातामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगला.

नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत १३४ धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने फलंदाजी करण्याची सुरुवात चांगली केली.

मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत विजय मिळवून दिला.

डी कॉकने चांगली सुरुवात करत ३० धावा केल्या आणि माघारी परतला.

सूर्यकुमार यादवने ४६ धावा केल्या.

तसेच लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांनी सुद्धा यश मिळवून दिले.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *