Fri. Aug 12th, 2022

ठाणे तुरुंगामधून एनसीबीची टीम इक्बाल कासकरसह रवाना

काश्मीरमधून मुंबईत हसीशची तस्करी केल्याच्या प्रकरणात कासकर याची चौकशी सुरू आहे. १५ जून रोजी एनसीबीने दादर गुरुद्वारातील एका खोलीतून बंदी असलेल्या तिघांना अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. नंतर आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. एजन्सीने आरोपींकडून ५.५ किलो चरस जप्त केला. हा पदार्थ जम्मू-काश्मीरमधून सापडल्याचे एनसीबीला आढळले आणि आरोपींच्या चौकशीदरम्यान कासकर यांचे नाव पुढे आले.

यानंतर एजन्सीने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २६७ अन्वये त्याची करण्यासाठी कोठडी घेण्याचा निर्णय घेतला.एनसीबीची टीम इक्बाल कासकरला घेवून निघाली इक्बाल कासकरला भिवंडी येथील न्यायालयात घेवून जाणार आहे. ठाणे कारागृह मधून एनसीबीची टीम घेऊन निघाली आहे. अमली पदार्थाचे कनेक्शन इक्बाल कासकरशी जोडले असल्याचा दावा खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकरला शुक्रवारी सकाळी ठाणे कारागृह येथून भिवंडी न्यायालयात हजर करणार आहेत.एसीबीच्या टीम इक्बाल कासकरला भिवंडी न्यायालयात हजर केल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.

यापूर्वी इक्‍बाल कासकरची वैद्यकीय तपासणी आणि कोविड चाचणी करण्यासाठी कासकरला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांमध्ये आणण्यात आले होते त्या ठिकाणी त्याची कोविड ची चाचणी व इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये इक्बाल कासकरचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. भिवंडी न्यायालयात एनसीबीची टीम ही इक्बाल कासकरला मुंबईला घेऊन जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.