Tue. Jun 18th, 2019

मुंबईचे कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची बदली

50Shares

निवडणूक आयोगाने मुंबईचे कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची बदली करण्याचे आदेश दिले आहे. निवडणूक आयोगाने देवेन भारती यांची बदली केल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या बदलीचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची बदली करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने त्यांच्या अचानक बदलीचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री त्यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे समजते आहे.

तसेच रविवारी म्हणजेच आज दुपारी 1 पर्यंत त्यांची बदली होणार असल्याचे समजते आहे.

तसेच त्यांच्या बदलीनंतर त्वरीत दुसरे सहआयुक्त त्यांची जागा सांभळणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्यांच्या निवडणूक आयोगाने कार्यकाळ संपलेल्या आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले होते.

मात्र निवडणुकांमुळे कायदा आणि सुव्सवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भारती यांची बदली करण्यात नव्हती आली.

मात्र निवडणूक आयोगाने अचानक बदली केल्यामुळे पोलीस दलामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

50Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *