Sat. Oct 16th, 2021

अभूतपूर्व : मुंबईच्या लाईफलाईनने वाचवली रुग्णाची लाईफलाईन

मुंबईच्या लाईफलाईनने एका रुग्णाची लाईफलाईन वाचवल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे. मुंबई परेलच्या ‘ग्लोबल रुग्णालयात’ लिव्हर प्रत्यारोपणाचा रुग्ण दाखल होता. तर दुसरीकडे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात रोड अपघातात मृत्यू पावलेल्या रुग्णाचं लिव्हर ‘ग्लोबल रुग्णालयात’ दाखल रुग्णाला बसवण्याचं निश्चित झालं. मात्र यानंतर ग्रीन कॉरिडोरऐवजी लिव्हर चक्क लोकल ट्रेनने ठाण्याहून परळला आणण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकाने काढलेलं लिव्हर प्रथमच रेल्वेतून दादर स्टेशन आणि तेथून परळच्या ग्लोबल रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात आणि अखेरची घटका मोजणाऱ्या रुग्णापर्यंत पोहचले.

 

मुंबई लोकलने यकृत ठाण्याहून दादरला

शुक्रवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयातील अपघातग्रस्त रुग्ण दगावला.

त्याचं लिव्हर (यकृत) काढून पऱळ येथील ग्लोबल रुग्णालयातील रुग्णाला बसविण्यासाठी ताबडतोब हलचाली सुरू झाल्या.

मृतकाच्या शरीरातून काढलेलं यकृत काही कालावधीपुरतं कार्यक्षम राहत असल्याने विनाविलंब लिव्हर प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते गरजेचं होतं.

ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात रुग्णवाहिकेसह ग्लोबल रुग्णालयाचे डॉ अनुराग श्रीमंत आपल्या अन्य सहकारी डॉक्टरसह पोहचले.

दुपारी 2.45 वाजता लिव्हर घेऊन रुग्णवाहिका ठाणे स्टेशनच्या दिशेने निघाली.

वाहतूक कोंडीतून वाट काढत निघालेल्या रुग्णवाहिकेची ठाण्यातील वाहतूक थांबवून सर्व सिग्नल सुरू ठेवण्यात आले होते.

रुग्णवाहिका गतीने ठाणे स्टेशनात पोहचली आणि 2.57ची लोकल पकडून थेट दादर स्थानकावर पोहचली.

पूर्वेला बाहेर पडताच रुग्णालयाची दुसरी रुग्णवाहिका तैनात होती. लिव्हर घेऊन डॉक्टर अनुराग हे परळ येथे रवाना झाले आणि रुग्णालयात वेळेत पोहचले.

साध्या रस्त्यावर वाढती वाहतुकीमुळे लिव्हर रुग्णालयात पोहचण्यासाठी ज्यादा कालावधी लागला असता.

त्यामुळे लिव्हर क्षमता लोपण्यापूर्वीच रुग्णालयात प्रत्यारोपणाच्या प्रक्रिया होणं गरजेचं असल्यानं अखेर रेल्वेच्या जलद मार्गाची निवड करण्यात आली.

मात्र त्यामुळे यकृत वेळेत रुग्णापर्यंत पोहोचलं आणि रुग्णाला जीवनदान मिळालं.

प्रथमच अशा प्रकारचा निर्णय आणि अशा प्रकारचा प्रवास करावा लागला.

या प्रवासात पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉक्टरांनी त्यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *