Tue. Sep 27th, 2022

मुंबईत रविवारी मेगाब्लॉक

मुंबई: मुंबईत रेल्वेरुळ आणि इतर तांत्रिक बाबींच्या देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान विविध मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे.

ठाणे ते वाशी / नेरुळ अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान ब्लॉक असणार आहे. तसेच चुनाभट्टी /वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान ब्लॉक राहणार आहे.

डाउन हार्बर मार्गावर वाशी / बेलापूर /पनवेलकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ वाजेपर्यंत सुटणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे/ गोरेगाव दरम्यान डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालविल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्गाने आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे. मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.