Fri. Jun 18th, 2021

मुंबईकरांसाठी खुशखबर…

जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी सेवेत असणार लोकल…

मुंबई – मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल बंद करण्यात आली होती. लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांना फार त्रास झाला. लॉकडाउन असल्यामुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले. मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही.

काही दिवसांवर नाताळ सण येणार आहे आणि नवीन वर्षाची धामधूम सुरू होणार आहे. यापुर्वी मुंबईकरांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. आता पुन्हा एकदा, सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल ही जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे ठप्प पडलेली मुंबईची ‘लाईफलाईन’ लोकलसेवा बंद करण्यात आल्यान मुंबईकरांना अनेक संकटांना सामोरी जावं लागलं होत मात्र आता मुंबईरांना नवीन वर्षानिमित्य भेट स्वरूपात मुंबई लोकल प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. तसेच आता महिलांना देखील लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती त्यानंतर २३ नोव्हेंबरपर्यंत वकिलांना परवानगी दिली होती.

मार्च महिन्यापासून मुंबईची लोकलसेवा ठप्प आहे. मात्र, सर्वांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. शिवाय दिवाळीत लोकल प्रवासाच्या मागणीने जोर धरला होता त्यामुळे आता लोकल जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी सेवेत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *