Fri. Sep 30th, 2022

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .

मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसाट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. अशावेळी आता पुढील ३ ते ४ तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल १६० ते १८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.