Tue. Jan 18th, 2022

“माझ्या परवानगीविना मला जन्म का दिला?” मुलाचा जन्मदात्यांवर खटला!

‘मला विचारून मला जन्म का दिला नाही?’ असा अजब सवाल करत मुंबईतील एका तरूणाने चक्क आपल्या आई-वडिलांवर खटला गुदरला आहे.

फेसबुकवर सध्या राफेल सॅम्युएल या तरुणाची चर्चा सुरू आहे. 27 वर्षीय राफेलने अत्यंत विचित्र प्रकरणात आपल्या आई वडिलांवर खटला दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. माझी परवानगी न घेता मला जन्म का दिलात, याचा जाब राफेलने आपल्या पालकांकडे मागितला आहे.

खरंतर आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडिलांना देवाचा दर्जा दिला जातो. आपल्याला 9 महिने पोटात वाढवणाऱ्या, यातना सहन करून जन्म देणाऱ्या आणि आपल्याला मोठं करण्यासाठी कष्ट करणाऱ्या मातापित्यांचे उपकार अनंत मानले जातात. मात्र राफेल मात्र वेगळ्याच विचारांचा आहे. पण राफेल मात्र आई-वडिलांचा आदर ही संकल्पना भंपक असल्याचं मानतो.

राफेलचे विचार!

जन्म घेणं ही नुकसानदायी असतं.

सर्व प्रजातींमध्ये मानवच फक्त विध्वंसक विचारांचा असतो.

तो आपल्या कृत्यांनी जग उद्धवस्त करत असतो.

सृष्टीचं नुकसान करणाऱ्या मानव जातीला आळा घालायला हवा.

अशा मानव प्रजातीचं पुनर्उत्पादन आणि प्रजनन हा गुन्हा असतो.

आई-वडिलांचा आदर ही संकल्पना भंपक आहे.

वयाच्या तिशीतल्या दोन जीवांना एकत्र यायचं असतं, त्यातून मुलांचा जन्म होतो.

पण मुलांना जन्म देणं हे काही आई-वडिलांचं कर्तव्य नसतं.

मुलं आई-वडिलांचं काहीच देणं लागत नाही.

या विचारांमुळेच राफेलने आपल्या जन्मदात्यांवर खटला दाखल केलाय.


माता-पित्यांशी कटू संबंध नाहीत…

राफेलचे आपल्या मातापित्यांशी कटू संबंध नाहीत

मात्र वैचारिक पातळीवर आपला लढा असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

माणसाने माणसाला जन्माला घालून जगाचा संहार करणं हे त्याला पटत नाही.

“माझं माझ्या आई-वडिलांवर प्रेम आहे. पण माझा जन्म त्यांच्या प्रेमसंबंधांतून झाला. माझं आयुष्य छान असलं, तरी अशा पद्धतीने मी आणखी मनुष्य जन्माला घालून जगाचा विनाश करू शकत नाही. मी मनुष्य जन्माला घातल्यावर पुन्हा त्यांना शिक्षण, नोकरी यांसारख्या चक्रात अडकावं लागेल. मात्र त्यांना जन्मच दिला नाही, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.” असे विक्षिप्त विचार राफेलचे आहेत.

आपल्या विचारांच्या प्रसिद्धीसाठी त्याने फेसबुकवर पेज सुरू केलंय. या पेजवर तो आपल्या बालक-मुक्त जगाच्या संकल्पना मांडत असतो. अत्यंत अजब आणि तऱ्हेवाईक वाटणाऱ्या राफेल सॅम्युएलचे विचार मानणारे लोकही त्याच्या पेजवर आवर्जून भेट देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *