किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला..

कोरोनाच्या महामारीत एकमेकांना भेटणे शक्य न्हवते त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटणे गरजेचे असते. परंतु या कोरोनाच्या महामारीत आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत.
त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी घनश्याम कोळंबे यांच्या “ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड” या व्यसपीठाद्वारे “डायरेक्ट सेलिंग अवार्ड” आणि “बिझनेस अवॉर्ड” हे दोन महत्वाचे पारितोषिक देण्यात आले या सोहळ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची विशेष उपस्थिती होती.