Sat. Jun 19th, 2021

‘ते ट्विट मी नाही, तर शिवसैनिकाने केलं होतं’

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्या ट्विटमुळे समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. लशींच्या ग्लोबल टेंडरबाबत प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून ‘ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं’ अशी माहिती दिली आहे. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

किशोरी पेडणेकर यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता,’बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं’, असं स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिलं आहे.

तसेच, ‘ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं. तसंच त्या मुलाला परत माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं’, असं पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *