Wed. Jun 19th, 2019

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

0Shares

तिन्ही मार्गावर दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान हा ब्लॉक असून मध्य रेल्वेच्या कल्याण-अंबरनाथ मार्गावर दिवसा ब्लॉक आहे. टिटवाळा-कल्याण मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या वेळेस ब्लॉक असेल.

हार्बर रेल्वे मार्ग

सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर स.११.४० ते दु.४.१० पर्यंत ब्लॉक असेल.

यामुळे सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान लोकल फेऱ्या रद्द असतील

प्रवाशांसाठी कुर्ला स्थानकातून विशेष लोकल फेऱ्या असतील.

मध्य रेल्वे मार्ग

कल्याण ते अंबरनाथ दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर स.१० ते दु.४ पर्यंत ब्लॉक असेल.

कल्याण-बदलापूर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द असून बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष फेऱ्या आहेत.

टिटवाळा ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर रात्री १२ ते पहाटे ३ पर्यंत ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे मार्ग

सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

फक्त पाचव्या मार्गावर स.१०.३५ ते दु.३.३५ पर्यंत ब्लॉक असेल.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: