Wed. Jun 26th, 2019

आज मुंबईत ‘म्हाडा’ची महागडी सोडत

0Shares

मुंबईत आज म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची सोडत सुरू झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून म्हाडाच्या संकेतस्थळावरून या सोडतीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या सोडतीसाठी 1 लाख 64 हजार अर्ज प्राप्त झाले होते, आणि यामध्ये म्हाडा सोडतीच्या पहिल्या भाग्यवान विजेत्या अनिता तांबे ठरल्या आहेत.

363 प्रतिक्षा नगर सायन अत्यल्प उत्पन्न गटाच्या या पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. तसेच राजीव धडवड, राहुल पवार , पराग घायवत यांनांही म्हाडाची लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या सोडतीचं थेट प्रक्षेपण https://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करून घरबसल्या पाहता येणार आहे. आता सर्वात महागडे घर कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: