Sat. May 25th, 2019

सीएसएमटी दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे संध्याकाळपर्यंत ठरवा : देवेंद्र फडणवीस

0Shares

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरूवारी गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर या दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातील जखमींना भेट दिली. तसेच त्याच्या प्रकृतीची विचारपूसही केली. संध्याकाळपर्यंत या  दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ज्या पुलांचं ऑडिट झालंय, त्यांचं पुन्हा ऑडिट व्हावं, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनास्थळाची पाहाणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील हिमालय पादचारी पूलाचा भाग काल गुरूवारी  गर्दीच्या वेळी कोसळला.

यात भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जण ठार आणि 33 जण जखमी झाले.

11 जखमींना जी.टी.आणि 17 जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी  दुर्घटनास्थळाची पाहाणी केल्यानंतर या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातील जखमींना भेट दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

संध्याकाळपर्यंत या  दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांनी दिले.

ज्या पुलांचं ऑडिट झालंय, त्यांचं पुन्हा ऑडिट व्हावं, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे पकडण्यासाठी धावाधाव सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.

पुलावरील सारे प्रवासी काही कळण्याच्या आतच पुलाच्या भागासह रस्त्यावर कोसळले.

मोठा आवाज झाल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.

धुरळा, आर्कोश, आरडाओरडा आणि रक्तबंबाळ झालेली माणसं अशी भीषण स्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *