Wed. Jan 26th, 2022

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई मनपाचा प्लान

गेली दीड वर्षे कोरोना विषाणूने प्रेत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले होते. मात्र आता कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावत असताना कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा भारतात शिरकाव झाला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेता विषाणूला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. आयुक्त इक्बाल चहल यांनी हा ऍक्शन प्लान तयार केला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर मनपाचा ऍक्शन प्लान मोठ्या प्रमाणात कामी येणार आहे. मनपाच्या या प्लाननुसार, ओमायक्रॉन विषाणू पसरण्याचा जास्त धोका असणाऱ्या देशातून विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची यादी करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळाचे सीईओ परदेशी प्रवाशांची यादी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला यादी पाठवणार आहेत. या यादीच्या माध्यमातून परदेशी प्रवाशांनी मुंबईत प्रवेश केल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून मनपाला देण्यात येणार आहे.

कोरोना लसीच्या दोन डोसनंतर बूस्टर डोस उपलब्ध झाल्यास नागरिकांनी बूस्टर डोस घेणे अनिरवार्य असल्याचे मनपाच्या ऍक्शन प्लानमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच आपल्या नजिकच्या परिसरात कोण नवीन येत आहे ते नागरिकांनी पाहावे, तसेच प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावरही पालिकेची करडी नजर असणार आहे.

२ डिसेंबरपर्यंत मुंबई विमानतळावर हायरिस्क देशातून एकूण ३,१३६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २,१४९ प्रवाशांची आरपीटीसीआर चाचणी पूर्ण झाली असून त्यामध्ये १० प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *