Sat. May 30th, 2020

मुंबईत 15 टक्के खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण करणं बाकी पालिकेचा अजब दावा

मुंबईत एकीकडे खड्ड्यांचं साम्राज्य असताना केवळ 15 टक्के खड्ड्यांच्या तक्रारींचा निवारण करणं बाकी असल्याचं पालिकेच म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात मात्र मुंबईत असंख्य खड्डे पाहायला मिळत आहेत. मुंबईकर पालिकेच्या मोबाईल अॅपवर तक्रारी करत आहेत. पण या सगळ्या तक्रारी पालिकेने दूर केल्याचा पालिका दावा करत आहे.
पालिकेच्या 10 जुन ते 7 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार फक्त 15 टक्के खड्यांच्या तक्रारीचं निवारण करणं बाकी आहे. 15 टक्के खड्डे म्हणजे शेकडो खड्डे असु शकतात. कारण एका व्यक्तीने केलेली तक्रार ही 100 खड्ड्यांबाबत असली तरी ती तक्रार एक म्हणूनच पालिका स्विकारत आहे. यामुळे पालिकेने अजूनही पूर्ण खड्डे बुजवले नाही हे स्पष्ट होत आहे.

मुंबईत इतक्या तक्रारी

सगळ्यात जास्त तक्रारी या पुर्व म्हणजेच अंधेरी पुर्व मधून 371 इतक्या आहेत. तर त्याखालोखाल एस वॉर्ड भांडुप मधुन 222 तर  189 इतक्या तक्रारी मालाड पश्चिमेतुन प्राप्त झाल्या आहेत. तर गोरेगाव पश्चिमेतुन 165 तक्रारी प्राप्त झाल्यात. अशा एकुण 2648 तक्रारी पालिकेकडे आल्या पैकी अवघ्या 414 तक्रारींच निवारण करणं बाकी असल्याचा पालिकेचा दावा आहे.

वॉर्ड                     प्राप्त तक्रारी

अंधेरी पुर्व                  371

भांडुप                      222

मालाड पश्चिम         189

गोरेगाव पश्चिम        165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *