Sat. Oct 1st, 2022

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

विविध कामांनिमित्त पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर 10 मार्च रोजी मेगाब्लॉक राहणार. कल्याण ते दिवा अप जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक राहील. त्यामुळे ट्रेन उशिरानं धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली.

असं असेल लोकलचं वेळापत्रक

मध्य रेल्वे

कल्याण ते दिवा अप जलद मार्ग

वांद्रे दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवार-10 मार्च सकाळी- 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत

सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या जलद लोकल कल्याण ते ठाणे या दरम्यान धिम्या मार्गावरून वळवतील.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप व डाऊन धिमा मार्ग

रविवार-10 मार्च  सकाळी-10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत

चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान दोन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील.

हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी,

वांद्रे दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवार-10 मार्च  डाऊन मार्ग सकाळी-11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत

अप मार्ग सकाळी – 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत

सीएसएमटी ते वाशी, बेलापूर दरम्यान सर्व लोकल रद्द केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.