Thu. May 6th, 2021

26 जानेवारीपासून हॉटेल,मॉल्स राहणार 24 तास खुले

26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात.

यासंदर्भात मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं स्वप्न पूर होण्याच्या मार्गावर आहे.  आमदार आदित्य ठाकरे यांनीच ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती.

भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना मांडली होती.

मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही.

आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना पण झाला आहे.

त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का सुद्धा प्रश्न आहे.

नरिमन पॉईट, बीकेसी, काळा घोडा आणि मिल कंपाऊड भागात 26 जानेवारीपासून हॉटेल्स, मॉल्स, पब्ज 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामुळे उद्योगवाढीला प्रोत्साहन मिळून रोजगारनिर्मितीलाही मदत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.

मात्र त्याचवेळी पोलिसांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच रहिवासी भागातील नागरिकांना त्रास होण्याची शक्यताही विचारात घेऊन भाजपने विरोधाचा सूर आळवला आहे.

भाजपचा विरोध-

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स,पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल असं ट्विट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *