Mon. Jan 24th, 2022

मुंबईतील शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण ठप्प

मुंबई: मुंबईतील शासकीय लसीकरण केंद्रावर लशीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण बंद आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

‘मुंबईकरांनो,आम्ही सूचित करू इच्छितो की ९ जुलै, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र आणि वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू’, असं ट्विट मुंबई महापालिकेनं केलं आहे.

लशींच्या तुटवड्यामुळे संथ झालेली लसीकरण मोहीम आज मुंबईसह अनेक ठिकाणी ठप्प होणार आहे. लशींचा खडखडाट असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडीमध्ये शुक्रवारी लसीकरण बंद राहणार आहे.

लसीच्या तुटवड्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहरातही आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *