मुंबई अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट!

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असलेलं कलम 370 आणि 35 A कलम काढल्यापासून पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना कुरापती काढत आहेत. यातच भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी घुसणार असल्याचे संकेत भारतीय गुप्तचर विभागाने दिले आहे.

मुंबई अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहे.

समुद्रमार्गे अतिरेकी मुंबईत घुसण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत.

सुरक्षा यंत्रणा मुंबईत अलर्ट झाल्या असून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.

तसंच याबद्दल मुंबईकरांमधे जनजागृतीही करण्यात येत आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानक नेहमीच प्रवाश्यानी गजबलेलं असतं म्हणून रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तरीत्या या स्थानकावर श्वान पथक आणून तपासणी केली. तसंच प्रवाशांना याबाबत सावधान केलंय.

गणेशोत्सव असल्याने गर्दीमध्येच असामाजिक तत्वं हालचाली करणार असण्याची शक्यता असल्यामुळे काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी, तसंच सुरक्षितपणे प्रवास करा, असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय.

Exit mobile version