Thu. May 6th, 2021

का विकली मुंबईच्या ‘ऑक्सिजन मॅन’ने आपली एसयूव्ही?

राज्यात कोरोनाचं संकट असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सरकासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. असे असतानाच मुंबईत ऑक्सिजन सिलिंडरची गरज असलेल्या कोरोना रूग्णांना मदत करण्यासाठी शहानवाज शेख ह्यांनी आपली २२ लाख रूपयांची एसयूव्ही विकली आहे. शाहनवाज यांना ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाते.

मुंबईच्या मालाड येथे राहणाऱ्या शहानवाज शेख यांनी रूग्णांना मदत करण्यासाठी आपली २२ लाख रूपयांची एसयूव्ही विकली आहे. एका वर्षापूर्वी शाहनवाज यांच्या मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. तेव्हापासून शाहनवाज हे लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करतात. याकरिता यांनी कंट्रोल रूम तसेच हेल्पलाईन क्रमांक बनवला आहे.शहानवाज यांना दररोज मदत मागण्यासाठी ५०० ते ६०० फोन येत असतात.

शाहनवाज म्हणाले की, ऑक्सिजनची गरज असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आपली कार विकावी लागली. शहानवाज यांच्या पथकाने फोनच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी त्यांच्या नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून या पथकाने आतापर्यंत ४००० पेक्षा जास्त लोकांना मदत केली आहे.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *