Thu. Jun 17th, 2021

मुंबईत इंधन दरवाढीचा भडका

मुंबई: मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा भडकल्या असून मुंबईत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल १०२ रुपये प्रति लीटर झाला आहे.

गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आतापर्यंत फक्त ४ वेळा कपात झाली आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलचा दर ९४.१५ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७२ डॉलरच्या वर गेली आहे. यामुळे इंधनाच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये आतापर्यंत ६ वेळा दरवाढ झाली आहे. जूनमध्ये पेट्रोल १.६६ रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल १.६० रुपयांनी महागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *