Fri. Jul 30th, 2021

पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून हस्तगत

पाकिस्तानातून दुबईमार्गे मुंबईत येणाऱ्या दोन हजारांच्या बनावट नोटा मुंबई पोलिसांना हस्तगत केल्या आहेत. या नोटा वीस लाखांच्या होत्या.

धक्कादायक म्हणजे बाजारात या नोटा जर बाहेर आल्या तर त्याला कोणीही सहजासहजी ओळखू शकत नाही. अशा या नोटा आहेत.

२००० च्या नोटेप्रमाणेच अगदी सगळ्या बाजू बारकाईने निरीक्षण करून त्या नोटा बनवल्या गेल्या असल्याचा अंदाज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्तवला आहे.

दोन दिवसांपूर्वीच चीनमध्ये कनेक्शन असणारा एक टेलिकॉम एक्स्चेंज सेंटर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला होता. यामध्ये परदेशातून कॉल करून तो भारतात मिळत आहे असं भासवलं जात होत. तशीच करोडो रुपयांची लूट सुद्धा केली जात होती.

आज गुन्हे शाखेने केलेली ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. या पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा कदाचित दहशतवादी कारवायांसाठी वापर केला असता. असा धक्कादायक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *