Fri. Jul 30th, 2021

मुंबई पोलिसांकडून स्टिकरचा निर्णय मागे

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मुंबई पोलिसांकडून टाळेबंदीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून लाल,पिवळ्या, हिरव्या इमर्जन्सी स्टिकर्सचे वर्गीकरण बंद करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही स्टिकर्सची योजना करण्यात आली होती. मात्र अत्यावश्यक सेवेत नसलेले लोकसुद्धा याचा गैरवापर करत असल्याने पोलिसांनी हा निर्णय मागे घेतला आहे.मुंबई पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

‘संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल’,असं आवाहनदेखील पोलिसांनी केलं आहे.

अवघ्या ७ दिवसातच वाहनांवर खास रंगाचा स्टिकर लावण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. नागरिकांमधील संभ्रमामुळे मुंबई पोलिसांकडून निर्णय मागे घेण्यात आला आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *