Sat. Jun 12th, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर…

मुंबई : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात येत असतानाचं आता कोरोनाच्या नव्या प्रकार हा ब्रिटनमध्ये आढळून आल्यानं जगात आणखी एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानं भारतही सतर्कता बाळगल्या जात आहे. केंद्र सरकारकडून राज्याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारकडून पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूचना दिलेल्या आहे. शिवाय, मुंबईमधील एका क्लबमध्ये कोविडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यानं ३१ डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी सूचक इशारा दिला आहे. मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आल्यानं नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार आहे आणि विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.

कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना सर्तेकतेचा इशारा हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाला आहे. मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचं उदाहरण देत मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *