Thu. Jun 17th, 2021

मुंबई पोलीसने सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत केलं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”

देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून महाराष्ट्रातही कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यातील पोलीस आपल कर्तव्य बजावत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचं मुंबई पोलिसांचे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना होणारी ओढाताण, नागरिकांचं संरक्षण करतानाच कोरोनाचा धोका अशा अनेक समस्या असतानाही मुंबई पोलीसांमध्ये सकारात्मकता दिसून येते आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी एक मेसेज दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या ट्विटमध्ये “जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात तेव्हा” असं म्हणत फोटो शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डा चा एक डायलॉग आहे. ‘आय लव्ह इट’. रणदीप हुड्डाच्या चेहऱ्याच्या जागी कोरोनाच्या व्हायरलसचा फोटो लावून मुंबई पोलिसांनी तो शेअर केला आहे. यावर ‘आय लव्ह इट’ लिहण्यात आलं. म्हणजेच जर कुणी बिना मास्क बाहेर पडलं तर कोरोनाला बळी पडू शकतो असं यातून दर्शवण्यात आलं आहे.

नुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा मुंबई पोलीस करत आहे. मुंबई पोलीसांनी हा मॅसेज सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांसह कलाकारांनी देखईल प्रतिक्रिया दिल्या आहेत. या आधीदेखील अनेक वेळा मुंबई पोलिसांनी सिनेमाचे पोस्टर किंवा दृश्य शेअर करत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय कोरोनाच्या काळात नागरिकांकडून सर्व नियमांच पालन होतयं का याकडे मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *