Sun. Jun 20th, 2021

पोलिसांसाठी नवी ‘कॅप’!

ऐन उन्हाळ्याचा मौसम, निवडणुकांची धावपळ, लांबणाऱ्या ड्युटीची साशंकता आणि यामध्ये अडकलेला आपला पोलिसवर्ग. एखाद्या आणीबाणीच्या काळामध्य़े, दंगलीच्या काळात, गर्दी आवरताना, धावपळीच्या गोंधळात पोलिसांच्या गणवेशातला एक भाग म्हणजे त्यांची कॅप. पोलिसी गणवेशामध्ये पोलिसांना परिधान कराव्या लागणाऱ्या युनिफॉर्मच्या कॅपमध्ये आता बदल झाला आहे.

यापूर्वी वर्दीमध्य़े जी कॅप घालण्यात येत होती, त्या कॅपमुळे वर्दी परिधान केल्यानंतर वावरण्यामध्ये सहजता येत नव्हती. ती सतत डोक्यावरून घसरत असल्याने या कॅपसाठी एखादा पर्याय उपलब्ध करावा, याची मागणी होत होती. आता ‘बेसबॉल कॅप’चा पोलिसांच्या गणवेशामध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या अडचणीचा विचार करावा अशी मागणी पोलिसवर्गातून केली जात होती, मात्र त्यासाठी ठोस पावले उचलली गेली नव्हती. त्यामुळे आता कॅपसाठी नवा पर्याय उपलब्ध केल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

पोलिसी गणवेशामध्ये ‘बेसबॉल कॅप’चा समावेश

पोलिसांच्या गणवेशामध्ये डोक्यावर टोपी घालणं अनिवार्य आहे.

आधीच्या टोपीसोबतच आता ‘बेसबॉल कॅप’चा पर्याय काढण्यात आला आहे.

ही कॅप डोक्यावर नीट बसणारी आहे.

काळ्या आणि लाल अशा दोन रंगांचा समावेश असणार्या टोपीमुळे खाकी uniform ला थोडा वेगळा लूक मिळतो.

गणवेशातील या बदलाचं पोलीस वर्गातून स्वागत केलं जात आहे.

या टोपीच्या पुढच्या बाजूला पोलिसांचा लोगो आहे तर मागच्या बाजूला इंग्रजी शब्दामध्ये ‘MAHARASHTRA POLICE’ असे लिहिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *