Tue. Oct 26th, 2021

मुंबईत दोन कासवांना दिले जीवदान

मुंबईत दोन कासवांना जीवदान मिळालं आहे. एका महिलेच्या दक्षतेमुळे या दोन कासवांना जीवदान मिळालं आहे. सविता करलकर असे या महिलेचं नाव आहे.

सविता सकाळी १० च्या दरम्यान अंधेरीहून भांडुपच्या दिशेने बसने जात होत्या. यावेळेस त्यांना दोन मुलं संशयास्पद हालचाली करताना दिसली. यावेळेस त्या बसमधून उतरुन त्या मुलांजवळ गेल्या.

या मुलांजवळ त्यांना २ कासवं दिसली. ही २ मुलं कासवांना पाळण्यासाठी घरी घेऊन जात होते. ही २ कासवं सेफ्टी पिन मध्ये अडकलेल्या अवस्थेत होती. याची माहिती सविता यांनी पॉज – मुंबई एसीएफ या हेल्पलाईनवर फोनद्वारे माहिती दिली.

ही महिती मिळताच, निशा कुंजू आणि हितेश यादव त्वरित घटनास्थळी पोहचले. आणि या दोन्ही कासवांची सुटका केली.

या २ कासावांपैकी एका कासवाच्या तोंडामध्ये सेफ्टी पिन अडकली होती. या कासवांना आम्ही आमच्या ताब्यात घेतले.

अडकलेली पिन काढली. यानंतर त्यांना उपचारासाठी पशुवैद्यांकडे घेऊन गेलो. तसेच या दोन्ही मुलांकडून आम्ही मासे पकडण्याचा धागा (तंगूस) जप्त केला. अशी माहिती स्वयंसेवक निशा कुंजु म्हणाल्या.

“दोन इंडियन सॉफ्टशेल कासव जेव्हा माझाकडे आणण्यात आले. तेव्हा त्यांच्या तोंडात सेफ्टी पिन अडकली होती. ती सुखरूपपणे बाहेर काढण्यात आली. त्यानंतर जखमेवर औषधोपचार करण्यात आले.

कासवांच्या तोंडाला कुठलीही खोल जखम किंवा सूज आढळून आली नाही. दोन्ही कासव सामान्य असून त्यांचा आहारही योग्य पद्धतीने सुरू आहे.

थोडेदिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. या कासवांबद्दल वन विभागला माहिती देण्यात आली आहे.

या कासवांना लवकरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे पशु चिकित्सक डॉ राहुल मेश्राम म्हणाले.

दरम्यान कासवांना जीवदान दिलेल्या सविता करलकर या (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) च्या स्वयंसेविका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *