Wed. Jan 20th, 2021

हजारो महिलांचा सुर अथर्वशीर्ष पठणाने निनादला !

जय महाराष्ट्र, पूणे

 

पुण्यात ऋषीपंचमीचे औचित्य साधून आज पारंपारिक पेहरावात आलेल्या महिलांनी सामुहिक अथर्वशीर्ष पठणं केले. ३१ हजार महिलांच्या

समूह स्वरातील मंत्रोच्चाराने दगडूशेट हलवाई मंदिराच्या परिसरातील संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई

पाटील यांनीही उपस्थिती लावली होती.

 

तसंच, मुंबईतील सिध्दिविनायक मंदिरात देखील आज २ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण केले. सिध्दिविनायकमधील अथर्वशीर्ष

पठणाचं यंदाचं हे पहिलंच वर्ष होते. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह मराठी अभिनेत्रींनीही आपला सहभाग नोंदवत या मंगलमय

पठणाचा लाभ घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *