Mon. Sep 27th, 2021

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या दोघांवर काळाचा घाला

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल हद्दीत मुंबई लेनवर स्विफ्ट टॅक्सी आणि कंटेंनर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला.या अपघातातील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले असताना मागून येणाऱ्या टेंपोने जोरदार धडक दिली.

या अपघातानंतर दोन्ही कार बाजूला घेत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने मर्सिडीज कारला जोरदार धडक दिली.या विचित्र अपघातात मर्सिडीज कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्तंच्या मदतीसाठी धाऊन आलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा अशी मृतांची नावं आहेत, तर हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये आणि इतर एका जखमीवर पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *