पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला वेगवान कारने धडक दिली.

 

आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 

तर, एकजण गंभीर जखमी आहे. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, कंटेनर पुण्याच्या दिशेने येत असताना कामशेत बोगद्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव कारच्या चालकाचे

नियंत्रण सुटले आणि वेगवान कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली.

 

हा अपघात इतका भयानक होता की कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.

Exit mobile version