मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने प्रवास करताय तर ही बातमी वाचाच!
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पहिला ब्लॉक संपला. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. आता दुसरा ब्लॉक दोन वाजता घेण्यात येणार आहे. दरम्यान, आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक रोखण्यात आली होती.
पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आडोशी बोगद्याजवळ दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. सध्या ठिसूळ झालेली दरड काढण्याचं काम सुरु आहे. यासाठी दोन्ही बाजूकडील वाहतूक दुपारी सव्वा बारापासून थांबवण्यात आली होती. महामार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही अशाचपद्धतीने दरड हटवण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.