आगमन होणार नव्या पाहुण्याचे, ‘मुंबई- पुणे- मुंबई 3’ चा ट्रेलर रिलीज
एकमेकांशी सतत भांडणारे मुंबई-पुणेकर गौरी आणि गौतम एकमेकांच्या प्रेमात पडतात. हो- नाही करत विवाहबंधनातही अडकतात. अशी साधी, सोप्पी, सरळ प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘मुंबई- पुणे- मुंबई’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील, मुग्धाची जोडी प्रेक्षकांना प्रंचड आवडली आता या गाजलेल्या सिनेमाचा तिसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
या प्रसिद्ध चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. एकमेकांशी सतत वाद घालणाऱ्या या जोडीच्या संसारात एक गोंडस पाहुण्याचं आगमन होणार आहे आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये पाहायला मिळणार आहे. करिअरला महत्व देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात आनंदाचे वातावरण आणि गडबड गोंधळ सुरू होतो, अशी सुंदर कौटुंबिक कहाणी ‘मुंबई- पुणे- मुंबई 3’ पाहायला मिळणार आहे.