Mon. Jan 17th, 2022

राममंदिर निर्माणाचा ‘फुटबॉल’ शोभणारा नाही – शिवसेना

राम मंदीर हा खूप संवेदनशील विषय आहे.मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न कोर्टात चालू आहे.

त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची मध्यस्थ  समिती स्थापना केली.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे.

राममंदीर निर्माणाचा जो फुटबॉल झाला, तो शोभणारा नाही. असं मत या अग्रलेखातून शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

राजकारणी आणि न्यायालयात मागील 25 वर्षांपासून राममंदीर निर्माणाचा जो फुटबॉल झाला, तो काही हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राजकारणाऱ्यांना शोभणारा नाही.

प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला यात काहीच वाद नाहीच, तर अयोध्येतील नेमक्या कोणत्या जागेवर झाला, यावरून बाबरभक्तांनी घोळ घातला आहे.

अग्रलेखातून सवाल

राजकारणी, राज्यकर्ते आणि देशाचं सुप्रीम कोर्टही राममंदीराचा प्रश्न सोडवू शकलं नाही.

त्यामुळे न्यायालयाचे तीन मध्यस्थ काय करणार? हा प्रश्न उपस्थित झाला.

शिवसेना म्हणते की, निर्वृत्त न्यायमूर्ती फकीर मुहम्मद इब्राहिम खलीफुल्ला हे या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष आहेत.

वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री रविशंकर हे त्या समितीत आहेत.

म्हणजेच अयोध्येतील निर्मोही आखाड्याचे महंत सीताराम दास यांनी रविशंकर यांच्या नावाला विरोध केला.

या समितीत कोणतीही राजकीय व्यक्ती नको असं त्यांच म्हणणं आहे.

एमआयएम चे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी रविशंकर यांच्या नावाला विरोध केला आहे.

त्याऐवजी तटस्थ व्यक्ती नेमली असती तर अधिक बरं झालं असतं,असं त्यांनी म्हटलं.

खासदार डॉ. सुब्रहण्यम स्वामी यांनी हे राममंदीर खटल्यात एक पक्षकार आहे.तसेच मध्यस्थी मान्य असल्याचं जाहीर केलं.

राममंदीरासाठी अनेक वर्षे लढा देणाऱ्यांना मध्यस्थ प्रकरण मान्य नसेल तर सर्वोच्च न्यायालयानं हा सगळा खटाटोप का करावा ?

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *