Wed. Oct 5th, 2022

सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली

एकीकडे नाईटलाईफ सुरू करण्याची तयारी सुरू असणाऱ्या मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सामूहिक बलात्काराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आपल्या घरी निघालेल्या एका महिलेवर कुर्ला एलटीटी रोडवर महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय. बलात्कार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केलंय.

काय घडलं नेमकं?

पीडित महिला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशनला उतरून मध्य प्रदेशातील कटने येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात होती.

यावेळी साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली होती.

आरोपी सोनू तिवारी, निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे हजर होते.

त्यांनी महिलेला झाडीत ओढून घेऊन तिच्यावर बलात्कार करायला सुरुवात केली.

त्यावेळी आरोपी सिध्दार्थ वाघ, श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात होते.

त्यांनी ही घटना पाहिली आणि या महिलेला वाचवायचं सोडून तेसुध्दा गुन्ह्यात सहभागी झाले.

त्यांनीही आधीच्या आरोपींसोबत बलात्कार करताना अनैसर्गिक संभोग केला.

तसंच पिडीत महिलेकडील 3000 रुपये आणि मंगळसूत्रही खेचून पळून गेले.

त्या दुर्दैवी पीडित महिलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला.

पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने दोन आरोपींना लागलीच अटक करण्यात आलं.

इतर दोन आरोपींनाही अटक करण्यात आलं.

नेहरू नगर पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक 23 /2020 अन्वये भा.द.वि. 376, 377,394 प्रमाणे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.