Tue. Oct 26th, 2021

अर्ज न करताच 21 वर्षीय मुलाला Google मध्ये जॉब, 1.2 कोटींचं पॅकेज!

Google, Apple, Microsoft यांसारख्या जगातल्या top च्य कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंजिनिअर्स धडपडत असतात. IIT मधून बाहेर पडलेले अनेक तरुण परदेशात अशा बड्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवतात. कोटींची पॅकेजेस मिळणं हे काही Google मधील कर्मचाऱ्यांसाठी नवीन नाही. पण 21 वर्षीय अब्दुल्ला खान या मुंबईकर तरुणाच्या बाबतीत मात्र स्वप्नातही विचार न केलेली गोष्ट घडली आहे. तो IIT मध्येही शिकला नाहीये. एवढंच काय त्याने नोकरीसाठी apply सुद्धा केलं नव्हतं. त्याला Google कडूनच बोलावणं आलं.

Apply  न करताच Google मध्ये नोकरी!

अब्दुल्ला खान हा मुंबईच्या मीरा रोड भागातील श्री एल आर तिवारी इंजिनिअरिंग कॉलेज (Shree LR Tiwari Engineering College चा विद्यार्थी आहे.

त्यांचं शालेय शिक्षण सौदी अरेबियामध्ये झालं.

त्यानंतर तो मुंबईला राहायला आला.

मुंबई IIT मध्ये प्रवेश मिळवणं त्याचं स्वप्न होतं.

परंतु ते पूर्ण झालं नव्हतं.

अब्दुल्लाला ‘कोडिंग़’ करणं फार आवडतं.

मात्र त्याने कधीही Google मध्ये नोकरीसाठी अर्ज केला नव्हता.

उलट Competitive programming challenges च्या वेबसाईटवर अब्दुल्लाचं प्रोफाईल पाहून Google कंपनीनेच त्याला फोन करून इंटरव्ह्यूसाठी बोलावून घेतलं.

Google सारख्या प्रतिष्ठित जगातल्या Top च्या कंपनीमधून फोन येणं हे त्याच्यासाठी अनपेक्षितच होतं.

सुरूवातीला Google तर्फे अब्दुल्लाचा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला.

त्यानंतर लंडन ऑफिसमध्ये स्क्रिनिंग टेस्टही झाली.

आता Google ने 21 वर्षीय अब्दुलला चक्क 1.2 कोटीचं पॅकेज ऑफर केलं आहे.

आता अब्दुल Reliability Engineering Team सोबत काम करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

सप्टेंबर महिन्यापासून Google London Office ला जॉईन करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *