परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस

मुंबई: मुंबई महापालिकेने लसीकरणाबाबत काही नवे बदल केले असून ही सुधारित नियमावली शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कस्तुरबा, राजावाडी आणि कुपर रुग्णालयात जाऊन लस घेता येणार आहे.
लस घेताना विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठ प्रवेश निश्चिती पत्र, व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म ही कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.
पंचेचाळीस वर्षांवरील तसेच ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, इतर कर्मचार्यांमध्ये कोव्हिशिल्ड दुसरा डोस घेणारे, प्रसुती होऊन एक वर्ष झालेल्या स्तनदा माता यांना आता सोमवार, मंगळवार, बुधवारी घराजवळच्या लसीकरण केंद्रांवर नोंदणी न करता थेट जाऊन पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे.